Sharad Pawar | शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट | ABP Majha
राज्यात सत्तास्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (20 नोव्हेंबर) भेट घेणार आहे. संसद भवनामध्ये या दोन दिग्गज नेत्यांची भेट होणार आहे. दरम्यान आज संसद भवनात होणाऱ्या शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत विचारलं असता पवार-मोदी भेट नेहमी खिचडीच नसते, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तरीही या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पूर्ण राज्याचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.