Parsi Gymkhana: Ravi Shastri, पोलिस आयुक्तांच्या हस्ते पुरस्कार, पय्याडे स्पोर्ट्स क्लबचा विजय

Continues below advertisement

पारसी जिमखान्यानं गतविजेत्या पय्याडे स्पोर्टस क्लबचा २९८ धावांना धुव्वा उडवून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पोलीस ढाल क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. पारसी जिमखान्याचं यंदाच्या मोसमातलं हे सलग तिसरं विजेतेपद ठरलं. पारसी जिमखान्यानं यंदाच्या मोसमात तालीम ढाल आणि माधव मंत्री स्मृती क्रिकेट स्पर्धेचंही विजेतेपद पटकावलं होतं. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या पारसी जिमखान्याला पोलीस ढालीचा मान देण्यात आला. पारसी जिमखान्याचा सूर्यकुमार यादव फायनलमधला सर्वोत्तम फलंदाज आणि आतिफ अत्तरवाला हा फायनलमधला सर्वोत्तम गोलंदाज ठरला. पारसी जिमखान्याचाच सचिन यादव स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम गोलंदाज ठरला. पारसीच्याच सिद्धार्थ राऊतला स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गौरवण्यात आलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram