Parambir Singh यांच्याकडून Sachin Waze ला रोज दोन कोटींचं टार्गेट : Mumbai Police Crime Branch

Continues below advertisement

Param Bir Singh :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी सेवेतून बडर्तफ करण्यात आलेले वादग्रस्त पोलिस आधिकारी सचिन वाझे याला दररोज दोन कोटी रुपयांच्या वसूलीचं टार्गेट दिल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विशेष न्यायालयात दिली. सोमवारी सचिन वाझे याला विशेष न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तळोजा तुरुंगातून सचिन वाझे याचा ताबा घेतलाय. हॉटेल व्यावसायिक बिमल अग्रवाल यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात सचिन वाझेच्या विरोधात 9 लाख रुपयांच्या खंडणीची तक्रार दाखल केली होती. त्याआधारे वाझेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडं सोपवण्यात आलं होतं. या गुन्ह्यात सचिन वाझेसह परमबीर सिंह, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा नोंद झालाय. जानेवारी 2020 ते मार्च 2021 या काळात सर्व आरोपींनी आपल्याकडून 9 लाख वसूल केल्याचा आरोप तक्रारदार बिमल अग्रवाल यांनी केला होता.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram