Param Bir Singh : परमबीर-वाझे यांच्यात काही सेकंदांचा संवाद, तपशील गुलदस्त्यात
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झालेत. चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले. त्यावेळी दोघांमध्ये काही सेकंदांसाठी संवाद झाला. पण यावेळी दोघांमध्ये काय बोलणं झालं ते कळू शकलेलं नाही. तरी, चांदीवाल आयोगासमोर गैरहजर राहिल्यानं याआधी दोनदा बजावलेलं जामीनपात्र वॉरंट आता रद्द करण्यात आलं आहे.