Param Bir Singh : परमबीर सिंह यांच्यासंदर्भात पुढचं पाऊल उचलण्यापूर्वी बड्या अधिकाऱ्यांची खलबतं

तब्बल २३४ दिवसांनी दर्शन देणाऱ्या परमबीर सिंह यांच्याविरोधात कोणत्या स्वरुपाची कारवाई करता येईल, यासंदर्भात बड्या अधिकाऱ्यांची खलबतं सुरु आहेत.मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि इतर मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्यांमध्ये कायदेशीर बाबींवर बैठक सुरु असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप लावणाऱ्या परमबीर सिंह यांच्याविरोधातही अॅट्रॉसिटी आणि खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. दरम्यान आज सकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर परमबीर सिंह यांची कांदिवलीतल्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola