Palghar : वीज गेल्याची तक्रार करणाऱ्या ग्राहकाला महावितरणच्या उपअभियंत्याची दमदाटी,Audio Clipव्हायरल

पालघरमधील वाडा तालुक्यात वीज गेल्याची तक्रार करणाऱ्या नागरिकाला महावितरणच्या उपअभियंत्याने दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. फोनवर तक्रार करणाऱ्या  नागरिकाला अर्वाच्च भाषेत दम भरल्याचं संभाषण सध्या व्हायरल होतंय. या संतापजनक प्रकाराबद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. वाडा तालुक्यातील तोरणे गावात वीज गेल्याची तक्रार करण्यासाठी सदानंद मोकाशी यांनी महावितरणचे उपअभियंता कृष्णानंद दळवी यांना फोन केला. मात्र, तक्रार ऐकून घेण्याऐवजी दळवी यांनी मोकाशी यांना थेट अर्वाच्च भाषेत दमदाटी केली. जास्त बोललात तर तुमच्याविरोधात केस दाखल करीन, असा दम भरल्याचा आरोप मोकाशी यांनी केला आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार मांडणे हा गुन्हा झालाय का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola