Palghar Murder | प्रेयसीची हत्या करुन मृतदेह भिंतीत लपवला, मारेकरी तरुणाचं त्याच घरात वास्तव्य
पालघरमध्ये धक्कादायक घडना समोर आली आहे. तरुणाने प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत तीन महिने लपवून ठेवला होता. प्रेमविवाहासाठी घरातून पळून गेलेल्या एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. वाणगावमधील वृंदावन या सदनिकेल्या एका फ्लॅटच्या भिंतीत तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. हत्येच्या आरोपाखाली तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.