Babanrao Taywade : ओबीसी समाज संभ्रम, भीतीच्या छायेत, दबावात निर्णय घेतल्यास मुंबईकडे कूच
Continues below advertisement
मराठा समाजाबाबत दबावात येऊन सरकारने काही निर्णय घेतला तर ओबीसींच्या ४०० जातीही मुंबईकडे कूच करतील असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय. मराठा आंदोलनामुळे राज्यातला ओबीसी समाज संभ्रम आणि भीतीच्या वातावरणात आहे असं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्याशिवाय राज्य सरकार विशेष अधिवेशन घेऊ शकत नाही असं बबनराव तायवाडे म्हणाले.
Continues below advertisement