Teachers Protest | राज्यातल्या विना अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांचं आदोलन
केवळ माध्यमिक शिक्षणाचे माध्यम मराठी असल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने दीडशे शिक्षक उमेदवारांना नियुक्ती नाकारली आहे. असा आरोप करत मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातून आलेल्या 150 शिक्षकांनी बेमुदत आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. जोपर्यंत आम्हाला नियुक्ती मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याचं या शिक्षकांचे म्हणणे आहे.