गुन्हेगारांना गृहमंत्र्यांकडे घेऊन जाणारेच दोषी, व्हायरल फोटोवरून इम्तियाज जलिल यांची टीका
एकावर 500 ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल आहे. दुसऱ्यावर बलात्कार आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. तडीपारीची देखील कारवाई प्रस्थावित आहे. तर अन्य एकावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी आरआर पाटील यांच्या समवेत एक गुन्हेगार उभा असल्याचा फोटो समोर आला होता. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना देखील एका गुन्हेगारांसोबत फोटो पाहायला मिळाला. मात्र येथे गुन्हेगारांच्या मधेच गृहमंत्री असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Tags :
Atul Save Anil Deshmukh Photo Imtiaz Jaleel BJP MLA Viral Photo Home Minister Aurangabad Anil Deshmukh BJP