Noise Pollution : दिवाळीत राज्यातल्या ध्वनी प्रदूषणात वाढ, पाहा सर्वात जास्तं वाढ कोणत्या भागात झाली

Continues below advertisement

गतवर्षीच्या तुलेनत यंदा दिवाळीमध्ये राज्यातल्या ध्वनी प्रदूषणात वाढ झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. दिवाळीमध्ये दिवसाच्या ध्वनी पातळीत १.५ टक्के तर रात्रीच्या ध्वनी पातळीत 2.77 टक्के वाढ झालीय. संपूर्ण राज्यात 152 नोंदी घेण्यात आल्यात. ज्यामध्ये वसई-विरार परिसरात दिवसाच्या पातळीत सर्वाधिक वाढ पाहायला मिळतेय. 71.66 डेसिबल इतकी आवाजाची पातळी या परिसरात पाहायला मिळाली. तर रात्रीच्या पातळीत द.मुंबईत सर्वात जास्त आवाज वाढल्याचं पाहायला मिळतंय.रात्री द. मुंबईमध्ये आवाजाची पातळी 70.45 डेसिबलपर्यंत वाढली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram