Thane Protest : ठाण्यातील खोपट आगार बंद! राज्यभरातील एसटी आंदोलनात खोपट आगार कर्मचाऱ्यांचाही समावेश
एसटी महामंडळातील कामगारांना दिवाळीच्या दिवसात देखील रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत आहे. त्यांनी प्रशासनाकडे अनेक मागण्या केल्यानंतर ही कोणतीही सहानभूती न दाखवता कारवाई करण्याच्या इशारा प्रशासनने दिला आहे. एसटी कामगारांना समान काम समान वेतन मिळत नसल्याने सरकारला जाग येण्यासाठी ठाण्याच्या खोपट आगारात एसटी कामगारांनी कालपासून संप पुकारला आहे. तसेच एस टी शासनात विलगीकरण करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा एसटी कामगार संघटनेने दिला आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात मनसे आणि काँग्रेसने देखील पाठिंबा दिल्याने आंदोलनाला बळकटी आली आहे.