#Oxygen मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा नाही, लिंडे कंपनीत कोणताही तांत्रिक बिघाड नाही, फोनवरून माहिती

देशातील बर्‍याच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील पीएम केअर फंडमधून शासकीय रुग्णालयात 550 हून अधिक ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स उभारले जाणार आहेत. रुग्णालयात ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्यासाठी, पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार 551 नवीन वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांच्या स्थापनेस तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयानुसार हे ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर सुरू करावे, अशी सूचना पंतप्रधान मोदींनी केली आहे. या प्रकल्पांद्वारे जिल्हा पातळीवर ऑक्सिजनच्या उपलब्धतेस मोठी चालना मिळेल. 551 ऑक्सिजन प्लांटसाठी पीएम केअर फंडमधून निधी देण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola