Free Vaccine In Maharashtra : महाराष्ट्रात लस मोफत मिळणार! मंत्री नवाब मलिक यांची माहिती
Continues below advertisement
मुंबई : देशभरात येत्या 1 मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात 45 वर्षांवरील सर्वांचा मोफत लसीकरण करण्यात आलं होतं. मात्र 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण मोफत होणार का? असा प्रश्न होता. तर आता राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्यास सरकार सकारात्मक असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोफत लसीकरणासाठी अनुकूल असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
Continues below advertisement
Tags :
Corona Vaccination PM Modi Corona Vaccine Maharashtra Vaccination Vaccination COVID Vaccine Covid Vaccnation Free Vaccine Vaccination For All