Diwali 2021 : दिवाळीत 10 वर्षातील विक्रमी उलाढाल, देशभरात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी
यंदा दिवाळीची खरेदी अत्यंत खास होती, गेल्या वर्षीची दिवाळी सर्वांना घरीच साजरी करावी लागली. बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊनचे नियम कायम होते. यंदा सर्वांसाठी बाजारपेठा खुल्या होत्या, ठिकठिकाणी दिवाळीनिमित्त सेल, वेगवेगळ्या ऑफर्स होत्या. यात यावर्षी देशभरात नागरिकांनी गेल्या दहा वर्षातील सर्वात जास्त प्रमाणात दिवाळीसाठी खरेदी केलीय.