Mumbai Vaccination Drive : सलग दुसऱ्या आठवड्यात मुंबईत लसीकरणाला ब्रेक!
Continues below advertisement
लशीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यानं आज आणि उद्या मुंबईतील शासकीय आणि महापालिकेच्या केंद्रांवरील लसीकरण बंद आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या अशा बीकेसीच्या लसीकरण केंद्राबाहेरही लससाठा उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आलीय. परंतु आधी माहिती न मिळाल्यानं नेहमीप्रमाणे मुंबईकरांनी पहाटेपासून केंद्राबाहेर गर्दी केली. त्यात आता मुंबईचं जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात झालीय. लोकल प्रवासासाठी लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण होणं आवश्यक आहे. त्यामुळे आता लस घेण्यासाठी मुंबईकर लसीकरण केंद्रावर गर्दी करताहेत. पण अजूनही अनेकांना लस मिळाली नाही. दरम्यान, परवापासून लसीकरण पूर्ववत होईल अशी माहिती मुंबई महापालिकेनं दिलीय.
Continues below advertisement