Navi Mumbai Corona | नवी मुंबईतील पबमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन; पोलिसांची कडक कारवाई
वाशीतील पामबीच गॅलरीया मॉल मधील पबवर नवी मुंबई पोलिसांनी धाड टाकली आहे. यावेळी पबमध्ये 200 तरुण-तरुणी या पबमध्ये उपस्थित होते. कोरोना नियमांचं याठिकाणी पूर्णपणे उल्लंघन झाल्याचं पाहयला मिळालंय. उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या पथकानं या पबवर कारवाई केली आहे. नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं पालिकेने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.