MNS MahaMorcha | मनसे महामोर्चा : मनसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी खास टॉवर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मनसेच्या महामोर्चाची वेळ आता अगदीच जवळ आली आहे. थोड्याच वेळात मुंबईतील हिंदू जिमखान्याहून मनसेच्या महामोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब सहभागी होणार आहेत. तरी, अमित ठाकरेही मनसेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच मोर्चात सहभागी होणार आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूरमधून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानावरही कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.