MNS MahaMorcha | पुण्यात मनसैनिकांसाठी असेलेल्या बसवर भाजप आमदाराचं नाव, मनसेच्या मोर्चाला भाजपची साथ? |
मोर्चात सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते घरोघरी जाऊन पत्रकं वाटत आहेत. लोकांना मोर्च्यात सामील होण्याचं आवाहन केलं जातं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्य़ेक चौकात बूथ तयार केले आहेत. मोर्चा कसा निघणार याची माहिती ते लोकांना देत आहेत. फिरत्या गाड्यांमधूनही लोकांना मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलं जात आहे. मनसेच्या मोर्च्यासाठी भगव्या आणि काळ्या रंगाचे टी शर्ट छापण्यात आले आहेत.