Dasara Melava: शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा कसा असेल ?
ठाकरेंचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे एक प्रकारे पारंपारिक सोहळा असेल
शिवतीर्थवर येणाऱ्या साधारण हजार कार्यकर्त्यांसाठी खुर्च्या टाकण्यात येतील
शिवाजी पार्क मैदानाबाहेर सुद्धा एलईडी लावण्यात येतील जेणेकरून शिवाजी पार्कवर सुरू असलेली भाषण ऐकता येतील
सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची भाषणे होतील
प्रथेप्रमाणे शिवतीर्थावर शस्त्रपूजन सोने वाटप आणि रावण दहन होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषणांना सुरुवात होईल
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून रणशिंग फुंकले जाईल
आगामी विधानसभा निवडणूक, सध्याची राजकीय परिस्थिती, राज्यातील महिला सुरक्षा, हिंदूत्व, राज्य सरकारच्या योजना आणि निर्णय, राज्यातील प्रकल्प या सगळ्या संदर्भात मुद्दे उद्धव ठाकरे आजच्या भाषणात घेण्याची शक्यता आहे.