Nilesh Rane on Deepak Kesarkar : निलेश राणेंचं दीपक केसरकरांसाठी खोचक ट्विट, दोघांमधला कलगीतुरा कायम
Continues below advertisement
अभिनेता सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांवरुन शिंदे गटाच्या दीपक केसरकरांनी अप्रत्यक्ष का होईना, पण नारायण राणेंना डिवचलं.त्यानंतर केसरकरांनी सिंधुदुर्गात नारायण राणेंसोबत काम करण्याची तयारीही दाखवलीय. केसरकरांच्या या बदललेल्या भूमिकेनंतर नारायण राणेंचे पुत्र निलेश राणेंनी खोचक ट्विट केलंय. नोकरी मागायची असेल तर नीट मागा, १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे अशा आशयाचं ट्विट निलेश राणेंनी केलंय.
Continues below advertisement