Mumbai Attack Threat : NIA ला ई-मेलद्वारे मुंबईवर हल्ला करण्याची धमकी, मुंबई पोलीस सतर्क
राष्ट्रीय तपास यंत्रणेला ई-मेलवरून मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आलीय.... ई-मेल करणाऱ्याने तालिबानचं नाव घेत धमकी दिलीय.... मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचंही या मेलद्वारे सांगण्यात आलंय... एनआयएनं याची माहिती मुंबई पोलिसांना दिली असुन पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिलाय... त्यामुळं इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसांनीही तपासाला सुरूवात केलीय..