Ajay Gosria : बांधकाम व्यावसायिक अजय गोसरियांच्या कार्यालयावर NIA चा छापा ABP Majha
मुंबईच्या माहीम भागात ४ ठिकाणी एनआयएची छापेमारी केली असून यात माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवानी, यांच्या मालमत्तांचा समावेश आहे. सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू असलेल्या छापेमारीनंतर एनआयएनं चौकशीसाठी सोहेल खंडवानी यांना ताब्यात घेतलंय.. तर तिकडे ग्रँट रोड भागातून एनआयएनं छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट याला ताब्यात घेतलंय... तसंच पायधुनी भागातही एका ७१ वर्षाच्या व्यक्तीच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आलेय. संबंधित व्यक्ती दाऊद ट्रस्ट नावाची संस्था चालवत असल्याची माहिती आहे. दाऊदशी संबंधित ड्रग पेडलर्स, शार्प शूटर्स, आणि हवाला ऑपरेटर एनआयएच्या रडारवर असल्याची माहिती आहे.