Navneet Rana : नवनीत राणाप्रकरणात शिवसेनेनं लीलावती रुगणालयाला विचारले 'हे' दहा प्रश्न ABP Majha
Continues below advertisement
Shiv Sena Vs Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना लीलावती रुग्णालयात एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना तिथली व्हिडीओ शुटींग समोर आल्यानंतर शिवसेनेने रुग्णालय प्रशासनास चांगलचं धारेवर धरलं आहे. नवनीत राणा यांचा सीटी स्कॅन करतानाचा फोटो व्हायरल झाल्यामुळे तिथे फोटो कसा काढण्यात आला, याविषयी हॉस्पिटलने स्पष्टीकरण देण्याची मागणी करत राणांवर झालेल्या उपचारांविषयी शंका उपस्थित करण्यात आलीय. नवनीत राणांच्या उपचारांबाबत जाब विचारण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) , शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत, नवनीत राणांचा रिपोर्ट मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेकडून घेण्यात आला आहे.
Continues below advertisement