New Mantralaya for Disabled : दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय, मुख्यमंत्र्यांची मान्यता
दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळं आमदार बच्चू कडू यांच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. राज्यात दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय असावं या मागणीसाठी बच्चू कडू हे गेली २५ वर्षे प्रयत्न करतायत. त्यामुळं दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी बच्चू कडू यांच्याकडून मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लाडूचं वाटप करण्यात आलं. तीन डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनाचं निमित्त साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिव्यांग मंत्रालयाची घोषणा करण्यात येणार आहे. या मंत्रालयाची जबाबदारी आता बच्चू कडू यांच्या खांद्यावर सोपवण्यात येणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.