Jan Shatabdi Express नव्या रुपाात, विस्टाडोम कोचमधून कोकणाचं सौंदर्य अनुभवता येणार

Continues below advertisement

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी. चाकरमान्यांची सर्वात आवडती आणि सुपरफास्ट जनशताब्दी एक्सप्रेस आजपासून नव्या रूपात धावू लागली आहे. या गाडीचे आधीचे सर्व डबे बदलून त्या जागी आता नव्या रुपातले, सुरक्षित, वजनाने हलके मात्र तितकेच जलद असलेले एलएचबी प्रकारचे नवे डबे लावण्यात आले आहेत. याच सोबत नवीन डिझाईन केलेला विस्टाडोम कोच देखील लावण्यात आलेला आहे. या विस्टाडोम कोचमधून कोकणचे अफाट आणि अद्वितीय असे सौंदर्य वेगळ्या रूपात बघायला मिळणार आहे. नवीन डबे लावलेली ही गाडी आजपासून धावू लागली आहे. या सर्व बदलांसोबत आणखीन एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. तो म्हणजे जनशताब्दी गाडी आधी दादर ते मडगाव अशी धावत होती मात्र आता हीच गाडी दादर ऐवजी सीएसएमटी स्टेशन वरून सुटणार आहे. त्यामुळे वेळेमध्ये देखील थोडा बदल करण्यात आलेला आहे. नवीन रूपातील ही गाडी प्रवाशांच्या पसंतीस पडेल अशी खात्री मध्य रेल्वेकडून व्यक्त करण्यात आली आहे. या गाडीतील नवीन विस्टाडोम कोच हे प्रवाशांसाठी आकर्षण आहे. सुरक्षेच्या दृ्टीकोनातून या गाडीत नवीन यंत्रणा लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निसर्गाचा आस्वाद घेत असतानाच कोकण मार्गातून सुरक्षित प्रवास करायचा असेल तर जनशताब्दी एक्सप्रेस शिवाय पर्याय नाही. या नवीन अत्याधुनिक गाडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram