#Corona : मुंबईतील सोसायट्यांसाठी महापालिकेची विशेष नियमावली जाहीर, 'हे' नवे नियम तुम्ही वाचले का?

Continues below advertisement

मुंबई : राज्यात आणि मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मुंबईत वाढत असताना यामध्ये 90 टक्के रुग्ण हे इमारतींमधील आहेत. त्यामुळे महापालिकेने आता या निवासी सोसायट्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. 

मुंबईत आतापर्यंत पाचपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने 681 इमारती तर आठ हजार 790 इमारतींचे मजले सील करण्यात आले आहेत. प्रत्येक इमारतींमध्ये तसेच सोसायट्यांमधील रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने आता सोसायट्यांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram