Kalyan Rain : कल्याण तालुक्यात एनडीआरएफ पथक बाचावकार्यासाठी दाखल

मुसळधार पावसामुळे कल्याण शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण नगर मार्गावरील रायते, म्हारळ, कांबा, वरप आदी ठिकाणी तर भयानक परिस्थिती असून याठिकाणी कल्याणचे तहसिलदार दिपक आकडे यांनी एनडीआरएफचे पथकाला पाचारण केले आहे. कांबा येथे पुरजन्य परिस्थितीमूळे 4 जण पेट्रोल पंपाच्या छतावर अडकून पडले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी  एनडीआरएफच्या टीमला पाचारण केले असून आता हे पथक मदतकार्य सुरू करणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola