Shivaji Maharaj : मुलुंड रेल्वेस्थानकावर राष्ट्रवादीचं आंदोलन, महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

Continues below advertisement
कर्नाटकच्या बंगळुरू येथेछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केली व मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे असे वक्तव्य केले.याचे पडसाद आज मुंबई भर उमटत आहे.आज सकाळी मुलुंड रेल्वे स्थानकावर या घटनेच्या विरोधात मुलुंड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात आले.तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक ही करण्यात आला.या वेळी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकानी निषेध व्यक्त केला आणि कर्नाटक मुख्यमंत्री यांचा राजीनामा भाजप ने घ्यावा आणि त्या समाजकंटकांवर कडक कारवाई ची मागणी केली.याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram