North India: उत्तर भारतामध्ये तापामानाचा पारा घसरला,दिल्लीत सध्या 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Continues below advertisement

उत्तर भारतामध्ये तापामानाचा पारा घसरला असून कडाक्याची थंडी पडली आहे. राजस्थानच्या चुरुमध्ये उणे 2.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, राजधानी दिल्लीमध्येही थंडी वाढली आहे. दिल्लीत सध्या 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. थंड वारे वाहत असल्यामुळे सर्वत्र हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. तर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आणि जम्मू काश्मीरमध्ये वर्फवृष्टी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी बर्फाची चादर पसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पारा घसरल्यामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये उत्तर भारतात थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram