CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्द करण्याबाबतच्या याचिकेवर आता 31 मे रोजी सुनावणी!
CBSE आणि ICSE बारावीची परीक्षा रद्द करण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी याचिकेची प्रत प्रतिवाद्यांना सोपवली नसल्याचं सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं. त्यानंतर ही प्रत प्रतिवाद्यांना सोपवण्याचे निर्देश देत सुनावणी पुढे ढकलली. या याचिकेवर आता 31 मे रोजी सुनावणी होणार आहे.