Nawab Malik यांचे जावई समीर खान प्रकरणाचा तपासही एनसीबीने वानखेडेंकडून काढून घेतला
मुंबई : क्रूझ ड्रग्ज (Cruise Drugs Case) प्रकरणामध्ये झालेल्या विविध आरोपांनंतर एनसीबीचे (NCB) मुंबई झोनल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडून आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. पण यावर खुद्द समीर वानखेडे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. आर्यन खान आणि इतर पाच प्रकरणांचा तपास आपल्याकडून काढून घेण्यात आला नाही, तो आता केंद्रीय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे असं समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे.