NCB ला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही, लोकांना बदनाम करण्याचं काम सुरू : Nawab Malik
Continues below advertisement
मुंबई : एनसीबी ही देशातील एवढी मोठी तपास संस्था आहे, त्यांच्याकडे अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरात आहे. तरीही त्यांना तंबाखू आणि गांजा यातील फरक कळत नाही असा आरोप राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. एनसीबीकडून लोकांना बदनाम करण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नवाब मलिक म्हणाले की, "मुंबईत 8 जानेवारी रोजी एका व्हॉट्सअपवरुन काही माध्यमांना एक मेसेज करण्यात आला होता. आपण एक रेड करुन ड्रग्ज संदर्भात कारवाई करत असल्याचं त्यामध्ये आधीच सांगण्यात आलं होतं. महत्वाचं म्हणजे या माहितीच्या खाली समीर वानखेडे यांचं नाव होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. कानपूरला छापा मारण्यात आला आणि त्याची माहिती एनसीबीच्या माध्यमातून देण्यात आली."
Continues below advertisement