MHADA lOTTERY : म्हाडाच्या 8984 घरांसाठी दोन लाख 46 हजार अर्ज, लॉटरीला सुरुवात

Continues below advertisement

MHADA Lottery 2021 : दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक कुटुंबियांचं गृह स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण आज म्हाडा कोकण मंडळाच्या 8 हजार 948 घरांची सोडत जाहीर होणार आहे. म्हाडानं गेल्या महिन्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. या लॉटरीतील 8 हजार 948 घरांसाठी तब्बल 2 लाख 46 हजार अर्ज आले आहेत. त्यामुळे या सोडतीची चूरसही वाढली आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून या घरांच्या सोडतीला सुरुवात होणार आहे. एकेका संकेत क्रमांकानुसार, ऑनलाइन सोडत काढली जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram