Nayana Apte : कालिदास नाट्यगृहात 'अमृतनयना' कार्यक्रमाचं आयोजन
Nayana Apte : कालिदास नाट्यगृहात 'अमृतनयना' कार्यक्रमाचं आयोजन ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटेंच्या कला योगदानाला सांस्कृतिक मानवंदना देण्यासाठी मुलुंडच्या कालिदास नाट्यमंदिरात खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. नयना आपटेंच्या कारकीर्दीला ७० आणि त्यांनी वयाच्या पंचाहात्तरीत प्रवेश केल्याबद्दल संस्कृती सेवा न्यास आणि सवाईगंधर्व यांच्या संयुक्त विद्यमाने 'अमृतनयना' हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येेष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांच्या हस्ते नयनाताईंचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पंडित मुकुंद मराठे, ज्ञानेश पेंढारकर, निलाक्षी पेंढारकर, अपर्णा अपराजित यांनी गीतं सादर केली. तर गायत्री दीक्षित यांनी नृत्याविष्कार सादर केला. मंगला खाडिलकर यांनी नयनाताईंची मुलाखत घेतली. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तपस्या नेवे आणि अमेय रानडे यांनी केलं. यावेळी नयना आपटे यांच्या 'प्रतिबिंब' पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं प्रकाशनही करण्यात आलं. पत्रकार नागेश धावडे या पुस्तकाचं शब्दांकन करतायत. तर, जाऊ मी सिनेमात? या शांता आपटेंच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशनही यावेळी पार पडलं.