Nawab Malik : वानखेडे कुटुंबीयांना दिलासा, नवाब मलिकांच्या आरोपांची 9 डिसेंबरपर्यंत तोफ थंड
नवाब मलिक यांच्या आरोपांच्या फैरींपासून वानखेडे कुटुंबीयांना न्यायालयात दिलासा मिळालाय. पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे 9 डिसेंबरपर्यंत वानखे़डे कुटुंबीयांबाबत कोणतंही वक्तव्य करणार नाही अशी हमी आज नवाब मलिक यांच्यावतीनं न्यायालयात देण्यात आली. मलिक यांना बोलण्यास मनाई करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या एकलपीठानं दिला होता, त्याला ज्ञानदेव वानखेडे यांनी खंडपीठात आव्हान दिलं होतं. आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्तींनी मलिक यांच्या वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर पुढील सुनावणीपर्यंत कोणतंही विधान करणार नाही अशी हमी मलिक यांच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली आहे.