Nawab Malik : कोणत्याही अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन विकत घेतलेली नाही : नवाब मलिक ABP Majha

Continues below advertisement

Nawab Malik : देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे अंडरवर्ल्डसोबत कनेकशन होते. याचा खुलासा उद्या सकाळी मी करणार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की दिवाळीनंतर फटाके फोडू, पण मला वाटतं फटाके भिजले आणि वाया गेले. नवाब मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. मात्र देवेंद्रजी १९९९ ला तुम्ही या शहरात पहिल्यांदा आमदार म्हणून आलात. यापूर्वी मुंडे साहेबांनी अनेकांचे तार दाऊदशी जोडले. मात्र ६२ वर्षांच्या कार्यकाळात किंवा २६ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असे आरोप कोणी सिद्ध करु शकले नाहीत. मी कवडीमोल दराने जमीन माफियाकडून घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला. मात्र फडणवीसांना चुकीची माहिती कोणीतरी देतोय.. तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला कागदपत्र दिले असते. अंडरवर्ल्डचा खेळ जो सुरु केला आहे, आज मी बोलणार नाही, मात्र उद्या सकाळी १० वाजता देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी काय संबंध आणि मुख्यमंत्री असताना सर्व शहराला ओलीस ठेवलं होतं त्याचाा पर्दाफाश करणार, असं मलिक म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी राईचा पर्वत बनवला आहे. बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यांना देण्यात आलेली माहिती चुकिची आहे. फडणवीस यांनी कोणत्याही यंत्रणेकडे जावं, चौकशीसाठी तयार आहे. कोणत्याही अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन विकत घेतलेली नाही. कवडीमोल किंमतीत जमीन कुठेही जमीन विकत घेतली नाही. उद्या सकाळी अंडरवर्ल्डचा हायड्रोजनचा बॉम्ब फोडणार, असल्याचं मलिकांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram