Nawab Malik PC : ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का? : नवाब मलिक ABP Majha

Nawab Malik Live : गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्जचा साठा पकडल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का? असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे. मलिक यांनी म्हटलं की, मुंबई शहर ड्रग्जचं हब झालं आहे असा दावा वारंवार केला जातो. आता एक घटनाक्रम समोर आला आहे की गुजरातच्या द्वारका येथे 350 कोटी रुपये किमतीचं ड्रग्ज सापडले आहेत. समुद्रामार्गे गुजरातमध्ये येत सर्व देशभरात ड्रग्ज जातंय का? याची चौकशी करावी, अशीही मागणी मलिक यांनी केली.  मनीष भानुशाली, धवल भानुशाली सुनील पाटील हे गुजरातच्या नोव्हेंटॅल हॉटेल मध्ये राहत होते. त्यांचे किरीटसिंह राणा यांच्याशी संबंध आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा ड्रग्ज सापडल्यामुळे पुन्हा आता यांच्याबाबत संशय निर्माण झाला आहे, असं मलिक म्हणाले.  

मलिक म्हणाले की, आम्ही देशातील सर्व डीसीपींना विनंती करतो की देशांत कायदा यासाठी बनवण्यात आला होता. त्यामुळे ड्रग्जचे व्यवसाय बंद होतील. त्यामुळे आता गुजरातसारख्या राज्यातून अशाप्रकारे बाबी समोर येत आहेत. त्यामुळे डीसीपी, डीजी याबाबत योग्य कारवाई करतील अशी अपेक्षा आहे, असं मलिक म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola