Mumbai Cruise Drug Case बनावट ठरवायला Nawab Malik अॅथॉरिटी आहेत का? : BJP Pravin Darekar : ABP Majha
मुंबई : अलिकडच्या काळात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरल्या, आर्यन खानला आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीच्या कार्यालयात खेचत घेऊन जाणारे ते दोन व्यक्ती NCB चे अधिकारी नाहीत, ते भाजपशी संबंधित आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजपचे मनिष भानुशाली आणि केपी गोसावी त्या ठिकाणी कसे आले, त्यांचा या पार्टीशी काही संबंध आहे का याचं एनसीबीने द्यायला हवं अशी मागणीही त्यांनी केली.
नवाब मलिक म्हणाले की, "एनसीबीने शनिवारी मुंबईतील क्रूझवर टाकलेल्या छाप्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतरांना अटक केली होती. त्या दिवशी आर्यन खानला एक व्यक्ती खेचत एनसीबीच्या ऑफिसमध्ये घेऊन जाताना फोटो व्हायरल होत होता. नंतर याच व्यक्तीने आर्यन खान सोबत सेल्फीही काढल्याचं व्हायरल झालं होतं. सुरुवातीला हा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी असल्याचं सांगण्यात येत होतं. पण नंतर दिल्लीच्या एनसीबी कार्यालयाने हा व्यक्ती आपला अधिकारी वा कर्मचारी नसल्याचं स्पष्ट केलं."
या व्यक्तीचे नाव के.पी. गोसावी आहे आणि तो स्वत: प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे असं सांगतो. त्यामुळे यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा दावा नवाब मलिकांनी केला आहे.
यावर भाजपच्या प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.