ZP Panchayat Samiti By Elections : नाना पटोले आणि प्रवीण दरेकर यांची निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया

Continues below advertisement

Maharashtra ZP Panchayat Samiti By-elections : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सहा जिल्ह्यात होत असलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर सत्तेच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता मतदारांना आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 63 टक्के मतदान
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदांतील 84; तर त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील 141 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 63 टक्के मतदान झाले.  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या 6 जिल्हा परिषदेच्या 85 निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या 144 निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram