Devendra Fadnavis :नवाब मलिक यांनी दहशतवाद्यांकडून जमीन विकत घेतली? पाहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
Continues below advertisement
Devendra Fadnavis : तुम्ही लंवगी फटका फोडला, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यानी पत्रकार परिषद घेत मलिकांबाबत मोठा बॉम्ब फोडला आहे. नवाब मलिकांनी 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीकडून जमीन विकत घेतली. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबध आहेत. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. हे सर्व पुरावे मी तपास यंत्रणा आणि शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांची माळ लावली होती.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Ncp Devendra Fadnavis Sharad Pawar BJP Dawood Ibrahim Nawab Malik NCB BJP Sameer Wankhede Aryan Khan Mumbai Cruise Drug Case Sardar Shah Wali Khan BJP