Navi Mumbai | महाविकास आघाडीचं मिशन नवी मुंबई, भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी सज्ज
Continues below advertisement
नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तीन महिन्यांवर आली असल्याने येथील वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे. मनपावर भाजपा नेते गणेश नाईक यांची एकहाती असलेली सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चंग बांधला आहे. यासाठी आज वाशीत महाराष्ट्र विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला आहे. भाजपाने मात्र आपल्यासमोर कोणत्याच पक्षाचे आव्हान नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement