Akola Toor Dal Issue | तूर खरेदीच्या नोंदणीला सुरुवात, खरेदी केंद्र मात्र दफ्तरीच | ABP Majha
अस्मानी संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यासमोर आता सुलतानी संकट उभं ठाकलंय. कारण, राज्यात एकीकडे तूर खरेदीच्या नोंदणीला सुरुवात झालीय. पण, सरकारनं सध्या तूर खरेदीचं एकही केंद्र सुरु केलेलं नाही. त्यामुळं आधीच आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्याला हमीभावापेक्षाही कमी दरात तूर विकाली लागत आहे.