Navi Mumbai Turbhe : बीएमडब्ल्यू कार सर्व्हिस सेंटरला भीषण आग ; कोट्यवधींच्या कार्सचा कोळसा

 तुर्भे एमआयडीसी मध्ये असलेल्या बीएमडब्ल्यू कार सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. या आगीत कोट्यवधींच्या गाड्यांचा अक्षरशः कोळसा झालाय. शाॅर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे. अचानक भीषण आगीने पेट घेतल्याने  कार सर्व्हिस सेंटर मध्ये दुरूस्ती साठी आलेल्या गाड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहिती नुसार जवळपास २० गाड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत.  अग्निशमन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये ही आग पसरली नाही आणि धोका वेळीच टळलाय.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola