Navi Mumbai : 31st च्या पार्श्वभूमीवर नियम कडक, नवी मुंबईतील अनेक फार्महाऊस मालकांना नोटीस
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी पनवेलमधील फार्महाऊस मालकांना नोटीसा पाठवल्या आहेत. पनवेलमध्ये साधारण ५०० च्यावर फार्महाऊस आहेत. दरम्यान रात्रभर पार्टीचा धिंगाना सुरु राहिल्यास फार्महाऊस मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.