Navi Mumbai पोलिसांच्या प्रयत्नांना मोठं यश, 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल मिळवला परत, गुन्ह्यांची उकल
Continues below advertisement
Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांनी विविध गुह्यांचा छडा लावून परत मिळविलेला सुमारे 1 कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल 41 फिर्यादींना परत केला. परिमंडळ-1 अंतर्गत असलेल्या 10 पोलिस ठाण्यात मागील वर्षात दाखल असलेल्या विविध गुह्यांचा पोलिसांनी उत्कृष्टरित्या तपास करुन चोरीस गेलेला व फसवणुक केलेली मालमत्ता हस्तगत केला आहे. यावेळी पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्या हस्ते मुद्देमाल परत करण्यात आला. सोने चांदीचे किंमती दागिने, रोख रक्कम, मोटार वाहने व इतर वस्तु फिर्यादिंना परत करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने चेन स्नॅचिंग, घरफोडी, चोरी तसेच फसवणूक या सारख्या गुह्यांचा समावेश आहे.
Continues below advertisement