Navi Mumbai : नवी मुंबईत थर्टीफस्ट डिसेंबरच्या रात्री 44 जणांवर Drink and Drive प्रकरणी गुन्हा दाखल
Continues below advertisement
थर्टी फस्ट डिसेंबर रोजी रात्री वाहतूकीचे नियम मोडून रस्त्यावर फिरणार्या १७०० जणांवर पोलीस कारवाई करण्यात आली असून ४४ जणांवर मद्यप्राशन करून गाडी चालविण्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबईत सर्व रस्त्यांवर , मुख्य चौकात दोन हजारांच्या वर पोलीस आधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरोना नियम मोडून रस्त्यावर गर्दी करणार्या तसेच दारू पिवून हुल्लडबाजी करणार्या लोकांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. यासाठी सर्व ठिकाणी नाकाबंदी करून गाड्यांची तपासणी करण्यात येत होती. पहाटे पर्यंत बाहेर फिरून नविन वर्ष साजरे करणार्यांवरही पोलिसांनी करावाई केली आहे.
Continues below advertisement