Navi Mumbai Crime | शिवसेना नेते विजय चौगुले यांना खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी | ABP Majha

Continues below advertisement
महाराष्ट्र वडार मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नवी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते
विजय चौगुले यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी आली आहे. चौगुलेंना एका निनावी पत्राव्दारे ही धमकी आली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चौगुलेंना धमकी आल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. ५० लाख रुपये द्या नाहीतर, तुमचे
महिलेसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करतो, अशी धमकी पत्रातून देण्यात आली आहे. या प्रकरणी चौगुले यांनी रबाले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपले कोणतेही आक्षेपार्ह फोटो नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram