Navi Mumbai : भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती अटकेत, मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. संदीप म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट व्हॉट्सअॅपवर टाकल्याचा आरोप आहे. शिवसैनिकांनी ही आक्षेपार्ह पोस्ट पाहताच कोपरखैरणे पोलीस ठाण्यात संदीप म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. संदीप म्हात्रे यांच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.