CIDCO House Lottery | सिडकोच्या 'त्या' लॉटरी विजेत्यांना दिलासा, गेल्या चार दिवसात पैसे भरणाऱ्यांना दंड नाही
Continues below advertisement
येस बॅंकेवर आलेल्या निर्बंधामुळे सिडको लॉटरी विजेत्यांनाही नाहक भुर्दंड बसला आहे. सिडकोचे येस बँकेत खाते आहे. मात्र निर्बंध आल्यानं पेमेंट गेट वे बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे अनेकांना ठराविक मुदतीत पैसे भरता न आल्याने त्यांना दंड भरण्याची वेळ आली. यावर सिडको प्रशासनाने तोडगा काढला असून गेल्या चार दिवसात सिडकोचे पैसे भरणाऱ्या ग्राहकांना दंड न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गेल्या चार दिवसात ज्या लाभार्थ्यांनी दंडाचे पैसे भरले असतील त्यांना पुढील पेमेंटमध्ये सुट देण्यात येणार आहे
Continues below advertisement